Email Us : info@manasiinfotechbpo.com                          Call Us : +91 8087206814

Nagar Mall

सध्‍या इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. त्‍यामुळे कोणतीही वस्‍तू अथवा एखादी गोष्‍ट आपणास हवी असल्‍यास आपण सर्व प्रथम इंटरनेट वर शोध घेतो. हे आता सर्रास घडत आहे. भारता मध्‍ये सध्‍या मोठ मोठया कंपन्‍या ऑनलाईन क्षेत्रात आपले पाय रोवत असून तरूणांसाठी एक उदयोग क्षेत्राचे मोठे दालन खुले झालेले आहे. त्‍यामुळे अमर्याद रोजगाराच्या संधी उपलब्‍ध होत आहेत. हे प्रशंसनीयच आहे.

परंतू त्‍याच बरोबर छोटया शहरातील उदयोजक मात्र हवालदिल होतांना दिसतोय कारण ईकॉमर्सची वाढती स्‍पर्धा ! तसेच छोटया शहरातील ग्राहक सुध्‍दा ऑनलाईन ऑर्डर केल्‍यानंतर उत्‍पादन आपल्‍या दारापर्यंत पोहोचण्‍यास लागणारा कालावधी व त्‍याची विश्‍वासार्हता याबाबत साशंक होत आहे. 

मानसी इन्‍फोटेक अँड बीपीओ सर्व्हिसेस गेल्‍या 20 वर्षांपासून माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून विविध क्षेत्रातील व्‍यवसाया मध्‍ये माहीती तंत्रज्ञानचा वापर योग्‍य रितीने कसा करावा याबाबत काम करत आहे.

अहमदनगर सारख्‍या विकसित शहरामध्‍ये येथील व्‍यापा-यांची उत्‍पादने शहरातील नागरि‍कांना घरबसल्‍या ईकॉमर्स तंत्रज्ञान वापरून मोबाईल, कॉम्‍प्‍युटर, लॅपटॉपवर उपलब्‍ध करून देणे या उद्देशाने ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्‍ये प्रथमच ऑनलाईन पध्‍दतीने आम्‍ही NagarMall.Com हा शॉपिंग मॉल 2 ऑक्‍टोबर 2015 रोजी म.गांधी जयंती निमित्‍त सुरू केला आहे.

ग्राहकांचा वेळ वाचवणे व वाजवी दरामध्‍ये विविध प्रकारची उत्‍पादने उपलब्‍ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्‍येय आहे. या वेबसाईटवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कपडे, किराणा, घरगुती खादयपदार्थ अशा विविध प्रकारची उत्‍पादने उपलब्‍ध असणार आहेत. या वेबसाईटचा जास्‍तीत जास्‍त नगरकर लाभ घेतील अशी आशा आम्‍ही व्‍यक्‍त करतो.

October 03, 2015

Date

Online Shopping Mall (E commerce)

Category

Manasi Infotech and BPO Services

Client